Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लग्नासाठी मुलगी पाहायला आलेल्या तिघांचे अपहरण, 17 जणांना अटक

team by team
October 20, 2023
in क्राईम
0
लग्नासाठी मुलगी पाहायला आलेल्या तिघांचे अपहरण, 17 जणांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

लग्नासाठी मुलगी दाखविण्याचे अमिष दाखवून अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या काही तासातच बेड्या ठोकण्यात आल्या असून सुटकेसाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागीतली होती.

 

 

अधिक माहिती अशी की, किरणभाई रामजीभाई देसाई रा. रुम नंबर 213, कापुद्रा पोलीस ठाण्याच्या मागे, कृष्णा नगर, सुरत (गुजरात) हे गायी पाळून त्यांच्यापासून मिळणारे दुध विकून उदरनिर्वाह करतात. त्यांचे लग्नाचे वय झाल्यामुळे त्यांचे नातेवाईक मोहनभाई रबारी रा. तापी यांनी चार ते पाच दिवसापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील रविभाई रा. शहादा जि. नंदुरबार यांच्याशी संपर्क करुन लग्नासाठी स्थळ बघण्याबाबत सांगितले होते.

 

 

 

त्यानुसार रविभाई रा. शहादा यांनी चांगले स्थळ बघून लग्न जमवून देतो असे सांगितले. त्यानंतर रविभाई रा. शहादा यांनी किरणभाई देसाई यांना व्हॉट्सऍपवर काही मुलींचे फोटो दाखविले. फोटोतील एक मुलगी किरणभाई देसाई यांना पसंत पडल्याने त्यांनी प्रकाशा ता. शहादा येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत स्थळ बघण्यासाठी 18 ऑक्टोंबर रोजी जाण्याचे ठरविले. 18 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3.30 वा. सुमारास किरणभाई देसाई हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुलगी बघण्यासाठी प्रकाशा ता. शहादा येथे पोहोचले तेव्हा मुलगी दाखविणारे रविभाई रा. शहादा हे त्यांना भेटले व तेथे लग्नासाठी दोन मुलींचे स्थळ दाखविले,

 

 

परंतु चार ते पाच दिवसापूर्वी व्हॉट्सऍपवरलग्नासाठी दाखविलेल्या स्थळातील मुलींचे फोटो व प्रत्यक्ष दाखविले स्थळ हे वेगळे असल्याचे किरणभाई देसाई यांना लक्षात आले म्हणून त्यांनी व्हॉट्सऍपवर दाखविलेल्या फोटोतील स्थळाबाबत विचारपूस केली असता त्यांचे दोन दिवसापूर्वीच लग्न जमल्या बाबत रविभाई रा. शहादा यांनी सांगितले. त्यानंतर किरणभाई देसाई यांनी स्थळ बघण्यासाठी नकार देवून घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा रविभाई रा. शहादा यांनी स्थळ पाहण्यासाठी आणलेल्या दोन मुलींना नंदुरबार येथे सोडून देण्याबाबत विनंती केली.

 

 

 

किरणभाई देसाई हे घरी जाण्यासाठी निघाले असता नंदुरबार शहराच्या अलीकडे वाहनातील दोन मुलींपैकी एका मुलीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करुन वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन चालकाने वाहन थांबविताच तेथे 30 ते 35 वर्षे वयोगटातील 7 इसम आले व दमदाटी करुन त्यांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेवून गेले व स्थळ पाहण्यासाठी आलेल्या इसमांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले व सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी करु लागले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वाहन तेथून जात असतांना पोलीसांना काही तरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले, म्हणून पोलीसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता संशयीत इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लागलीच पोलीसांनी पाठलाग करुन 4 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे आणले.

 

 

 

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निलेश गायकवाड यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षकनिलेश तांबे व इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे सुचनेनुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेला प्रकार समजून घेतला. घटना अतिशय गंभीर स्वरुपाची होती म्हणून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना अटक करुन जबरीने हिसकावून नेलेले मोबाईल व रोख रुपये हस्तगत करुन आरोपीतांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर पुनम पावराची निवड

Next Post

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add