नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नवनवीन वसाहती तयार होत आहे परंतु या नवीन वसाहतीकडे नगरपालिका प्रशासनाचे अत्यंत दुर्लक्ष झाले असून वारंवार तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे .
नंदुरबार शहरातील नवीनच तयार करण्यात आलेल्या वसाहती सहारा टाऊन, शुभम पार्क, अनिल नगर, बापूजी नगर, शहाबाई नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती तयार झालेली आहे, परंतु या वसाहती मध्ये रस्ते , सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था नाही आहे.
नगरपालिकेच्या वतीने सांडपाणी निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती परंतू ही पाईपलाईन तुटून एक वर्षाच्या कालावधी लोटला तरी नगरपालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही. गेल्या एक वर्षापासून हे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे वारंवार तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही .येत्या आठ दिवसात या परिसरातील समस्या सोडवल्या गेल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याच्या ईशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे दिला.