नंदूरबार l प्रतिनिधी
काकर्दे ता. नंदुरबार येथे आयुष्यामान कार्ड बनवण्यास सुरुवात. येथील नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या हस्ते उद्घाटन करून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यास सुरुवात झाली.
ग्रामस्थांची सोय व्हावी यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्यमान कार्ड काढण्याच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच किरण मराठे, ग्रामपंचायत सदस्य कलाबाई भील , कांतीलाल भिल, रवींद्र माळी, विठोबा बेंद्रे, सुरेखा पाडवी पुंडलिक मराठे,वैशाली महाजन,
विमलबाई महाजन ,शामराव सोनार, राकेश माळी, विठोबा माळी, कमलेश ठाकरे ,शालिक ठाकरे, प्रकाश महाजन, मोहन माळी, रवींद्र भील, चंद्रसिंग पाडवी, दिनेश मराठे आदी उपस्थित होते. सरपंच रेखा राकेश माळी यांच्या हस्ते सोपान चव्हाण यांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.