Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांसाठी 17 सप्टेंबरला क्षमता परिक्षा

team by team
September 15, 2023
in राजकीय
0
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांसाठी 17 सप्टेंबरला क्षमता परिक्षा

नंदुरबार l प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आली असल्याची माहिती, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची क्षमता परीक्षा घेण्यात येत आहे.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शिखकांची एससीईआरटी, एनसीईआरटी या पाठ्यपुस्कातील अभ्यासक्रमावर आधारित क्षमता परिक्षा घेण्यात येणार आहे.

नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त शहादा, नवापूर व नंदुरबार या तीन तालुक्यातील 32 शासकीय आश्रमशाळा व 30 अनुदानित आश्रमशाळा मधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार व एकलव्य मॉडेल स्कुल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे.

तसेच तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुक्यातील 42 शासकीय आश्रमशाळा व 21 अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय आश्रमशाळा शिर्वे, दाब व तलाई या तीन परीक्षा केंद्रावर तालुका निहाय आयोजित करण्यात आली आहे.

प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग आयुक्त श्रीमती नयना गुंडे, अपर आयुक्त नाशिक विभाग संदीप गोलाईत व प्रकल्प अधिकारी मंदार पत्की (तळोदा) चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे 18 सप्टेंबर रोजी आयोजन

Next Post

16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान गणेशभक्तांना टोल माफी

Next Post
16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान गणेशभक्तांना टोल माफी

16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान गणेशभक्तांना टोल माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add