Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील गणेश मंडळ व डी.जे. / डॉल्बी धारकांचा सत्कार

team by team
September 14, 2023
in राजकीय
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील गणेश मंडळ व डी.जे. / डॉल्बी धारकांचा सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी

पालकमंत्री डॉ. विजकुमार गावित यांच्या हस्ते जिल्ह्यातील गणेश मंडळ व डी.जे. / डॉल्बी धारकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची विशेष उपस्थिती होती.

 

नंदुरबार शहरातील राजपुत लॉन्स येथे मागील वर्षी जिल्ह्यातील गणेश मंडळानी डी.जे. / डॉल्बीमुक्त न वाजविता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणाऱ्या गणेश मंडळांचा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे देखील उपस्थित होते.

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मागील वर्षी विविध सण / उत्सव दरम्यान विशेषतः गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन केले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.

 

यावेळी विजयकुमार गावित म्हणाले की, “जिल्हा पोलीस दलातर्फे डी. जे. / डॉल्बीमुक्त जिल्हा हा एक चांगला उपक्रम राबविला जात असून त्यात ते यशस्वी देखील झालेले आहे. देशात विविध जाती, धर्माचे लोक एकत्र राहातात. प्रत्येक जातीचे धर्माचे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात, परंतु सण उत्सव साजरे करतांना सामाजिक सलोखा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक एकमेकांच्या सण उत्सावात सहभागी होवून सौहार्दाचे व शांततेचे वातावरण निर्माण करुन सण उत्सव साजरे करतात, याचा त्यांना अभिमान असल्याचे सांगितले. शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयामुळे निश्चितच जातीय सलोख्याचे वातावरण राहिल. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून डेकोरेशनसाठी तयार करण्यात आलेले विविध देखावे हे समाजोपयोगी व नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील असे असले पाहिजेत, असे देखावे दाखवा की ज्यामुळे मनुष्याच्या जीवनात बदल होईल, संस्कृतीचा बोध होईल तसेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्सहाच्या वातावरणात साजरे करा असे सांगितले, सांगुन पोलीस दलाचे कौतूक केले.

 

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील म्हणाले की, पर्यावरणाची काळजी घेणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न देखील केले पाहिजे. डी. जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. यावर्षी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही महत्वाचे सण एकाच दिवशी येत आहेत, परंतु मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद हा सण अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा न करता 1 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मुस्लिम बांधवानी घेतलेल्या निर्णयामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल. सण साजरा करतांना इतरांना त्रास होणार नाही किंवा कायद्याचा आदर राखावा असे यावेळी सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस दलास चांगले सहकार्य केले असून त्याबाबत आभार व्यक्त केले.

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षी पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील गणेश मंडळांना डी.जे. / डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस दलाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव सण साजरा केला. जिल्ह्यातील विविध गणेश मंडळ गणेशोत्सव काळातच नव्हे तर वर्षभर पोलीस दलास सहकार्य करीत असतात. सण / उत्सावाच्या काळात पोलीस दलावर अतिरीक्त ताण येत असतो, परंतु जिल्ह्यातील बऱ्याच गणेश मंडळांनी पोलीस दलाच्या मदतीला स्वयंसेवक नेमून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात हातभार लावलेला आहे. डी.जे./ डॉल्बीमुक्त जिल्हा जनजागृती होण्यास मोलाचे सहकार्य प्राप्त झाले त्यांचे आभार व्यक्त केले.

 

 

मागील वर्षी गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी. जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करणे इत्यादी अनेक निकष पूर्ण करणाऱ्या गणेश मंडळांना उत्कृष्ट गणेश मंडळांचा प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. त्यात 1 ) नदुरबार शहरातील साक्री नाक्याचा राजा गणेश मित्र मंडळ 2 ) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नवनिर्माण गणेश मित्र मंडळ, आष्टे 3) उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानाचा निळकंठ गणपती, नंदुरबार 4) वनीता विद्यालय गणेश मित्र मंडळ नवापूर 5) श्री. राम गणेश मित्र मंडळ, विसरवाडी (6) तुप बाजार गणेश मित्र मंडळ, शहादा 7) विठ्ठल रुखमाई गणेश मित्र मंडळ, म्हसावद 8) भोईराज गणेश मित्र मंडळ, सारंगखेडा 9 ) सातपुडा तरुण गणेश मित्र मंडळ, धडगांव 10) नवयुवक गणेश मित्र मंडळ, अक्कलकुवा 11 ) क्षत्रिय माळी गणेश मित्र मंडळ तळोदा 12) सार्वजनिक दादा गणेश मित्र मंडळ, मोलगी यांचा तसेच शहरातील माळीवाडा गणेश मंडळाचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे सिरत कमिटीचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान व सहाकारी सदस्य यांचा देखील विशेष सत्कार पालकमंत्र्यांचा हस्ते करण्यात आला.

 

 

 

तसेच वर्षभर विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी वेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचेसह सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

जिल्ह्यातील 20 डी.जे. / डॉल्बी धारक व गणेश मंडळांनी एकमताने गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बी न वाजविता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन गणेशोत्सव सण साजरा करण्याचे जाहिर करुन स्वयंस्फूर्तीने डी. जे. व डॉल्बी सिस्टिम वाहन जिल्हा पोलीस दलाकडे स्वेच्छेने जमा करुन वाहनांच्या चाव्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचेकडे सुपुर्त केल्या.

 

 

यावेळी मोहन माळी, निंबा माळी, प्रवीण पाटील, महादू हिरणवळे, शहादा येथील कांतीलाल टाटीया व अक्कलकुवा येथील कय्युमभाई पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

तसेच यावर्षी गणेश स्थापना काळात सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करणे, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलालाचा वापर न करता फुलाच्या पाकळ्यांचा वापर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणारे गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसासाठी गणेश मंडळांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते.

 

 

सदर कार्यक्रमाचे वेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी शसदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार व जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे सुमारे एक ते दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आयुष्मान भव अभियानाचे उद्घाटन

Next Post

जिल्ह्यातील दिव्यांगांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावे; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रशासनास निर्देश

Next Post
जिल्ह्यातील दिव्यांगांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावे; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रशासनास निर्देश

जिल्ह्यातील दिव्यांगांचे ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावे; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रशासनास निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add