नंदूरबार l प्रतिनिधी
नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षण शिक्षकांचे काम रद्द न केल्यास मंगळवार दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षण कार्यालय (योजना) पुणे येथे मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करीत बहिष्काराचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षण कामावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
राज्याचे शिक्षण संचालक नियोजन डॉ. महेश पालकर यांची महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने आम्हाला मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेळ मिळावा यासाठी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याशी चर्चा केली .यावेळी आयुक्त यांनी मंत्रीमहोदय यांच्याशी चर्चा करून 5 सप्टेंबर शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांना गोड बातमी मिळेल असे आश्वासित केले होते. संचालक आपल्या मतावर ठाम असून ते सातत्याने हे काम शिक्षकांनी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करत होते. मात्र मध्यवर्ती संघटनेचे शिष्टमंडळ ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदन दिले आहे.
संचालक महोदयांनी कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासित केले आहे. राज्यातील सर्व शिक्षकांनी आपली एकजुट दाखवून येणाऱ्या काळात शासनाच्या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे यासाठी आपण सर्वजण संघटित होऊया असे आवाहन मध्यवर्ती संघटनेमार्फत राज्यातील शिक्षकांना केले आहे.तसेच सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा आला असल्याचे प्रहार शिक्षक संघटना,महा. तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.








