नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय भाबलपूर शाळेत झाले वृक्ष रक्षाबंधन साजरा करण्यात आला.यावेळी वृक्षांना राख्या बांधून विद्यार्थ्यांतर्फे पर्यावरण रक्षणासाठी संदेश देण्यात आला.
अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय भाबलपूर येथील शाळेत उपक्रमशील शिक्षक रविंद्र पाटील यांच्या संकल्पनेतुन अनोखे रक्षाबंधन करण्यात आले. प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण कर; झाडाला राख्या बांधून विद्यार्थ्यांतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी एक मोठ्या पिपळाचे वृक्षाला एक मोठी राखी बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावेत व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण व्हावे, अशी प्रतिज्ञा ह्यावेळी करण्यात आली.
राखी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूचा वापर म्हणजे जुने रंगी बेरंगी कागद,पुठ्ठा,जुन्या साड्याची लेस,बंगडी इ च्या साहाय्याने उपक्रमशील शिक्षक रविंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवीत राख्या बनविण्यात आल्या. राखी मध्ये झाडे वाचवा चा संदेश हि देण्यात आला आहे.झाडांना राखी बांधून राखीच्या माध्यमातून गावातील लोकांना पर्यावरणाचा अनोखा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला.
भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण प्रेमाचे प्रतीक म्हणून भावाला राख्या बांधतात. त्याचेच प्रतीक म्हणून विद्यालयात वृक्षाबंधन करत शाळेत सुद्धा बहीण भाऊ चे रक्षाबंधन विषयी संगीत गाणे लावून सर्व मुलींनी शाळेतील मुलांना आरती ओवाळून भाऊ समजून राखी बांधली.
ह्यावेळी वृक्षपूजन करताना पंचायत समिती सदस्या श्रीमती अंजना शिवराम वळवी, विद्यालयातील मुख्याध्यापक विरसिंग नाईक,दत्तात्रय जोहरी,उमेश मगरे,कुणालगिरी गोसावी,रविंद्र पाटील,सुरजितसिंग पाडवी,नितीन पाटील,श्रीमती वंता वळवी,ज्ञानेश्वर पाटील,वसंत पावरा, अंगणवाडी सेविका सावित्री वळवी,विमल पाडवी, सकीला पाडवी कार्यक्रमात उपस्थित होते.








