नंदुरबार l प्रतिनिधी
फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी वरिष्ठ गट पुरुष महिला फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले असून स्पर्धेचे
उद्घाटन छत्रपती पुरस्कारार्थी अशोक दुधारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र फ्लोअरबॉल
असोसिएशनचे सचिव रवींद्र चोथवे, माजी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, उपमुख्याध्यापक राजेश शहा, जिल्हा टेनीक्वाइट संघटनेचे श्रीराम मोडक, तालुका क्रीडा संयोजक मीनल वळवी, क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी, महेंद्र काटे, माजी नगरसेवक फरीद मिस्त्री, क्रीडा संघटक डॉ.मयूर ठाकरे, दीपक वाडे, भागुराव जाधव, खो खो प्रशिक्षक अनिल रौंदळ आदी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना अशोक दुधारे यांनी फ्लोअरबॉल खेळात खेळाडूंना संधी असून या संधीचे सोने करा अथक परिश्रम करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत प्राविण्य प्राप्त करा राज्य स्पर्धेतून खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून यातूनच खेळाडू घडतील असा संदेश खेळाडूंना दिला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी स्नेहल भगत, नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र माळी , आकाश बोडरे, जगदीश वंजारी, वसीम शेख, बी.डी .जाधव, योगेश माळी, मनीष सनेर, आकाश माळी प्रदीप माळी, दुर्गेश पवार आदींनी परिश्रम घेतले.राज्यातील 18 जिल्ह्याचा सहभाग घेवून निवड होणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.








