नंदुरबार l प्रतिनिधी
ज्याप्रमाणे पतसंस्था, बँका कर्जदारांना कर्जाचे वितरण करीत असते त्याचप्रमाणे कर्जदाराने देखील कर्जाच्या हप्ता वेळेवर फेडवा. वेळेवर कर्ज फेडल्यास बँका देखील पुढील वेळेस कर्ज देण्यासाठी विचार करत असतात त्यामुळे सहकाराचे पालन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार तालुका विधेयक समितीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सेवकांची सहकारी पतपेढीची ४५ वी सर्वसाधारण सभा विधी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी घेण्यात. सभेचे दीपप्रज्वलन करून माजी आमदार रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मार्च अखेरची तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद मंजूर करणे, ऑडिट मेमोचे वाचन करून दुरुस्तीस मंजुरी देणे,अंदाजपत्रक मंजूर करणे,सचिवांच्या मानधनात वाढ करणे,संचालक मंडळाने नफा वाटणी बद्दल केलेल्या शिफारशी मंजूर करणे, लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील, व्हॉइस चेअरमन पुष्पेन्द्र रघुवंशी,माजी चेअरमन अरुण हजारी,संचालक सुनील पाटील,सुनील साठे,छगन पाटील,योगेश निकुंभ,अरुण नाईक,जितेंद्र राजपूत, भास्कर पवार,अरुण सैंदाणे,सारंग परदेशी,मंगला माळी, लीलावती वसावे,सचिव एस.एम मंसूरी व सदस्य उपस्थित होते.