Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पशुधनावरील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
August 26, 2023
in राज्य
0
पशुधनावरील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्ह्यातील विविध ठिकाणी पशुधनामध्ये लंपी स्किन डिसीज या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, परिवहन आणि गृह विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

 

 

लंपी स्किन डिसीज या साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नुकतीच संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त डॉ. मनोज पावरा, जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर, तसेच जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

योवळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांना लंपी स्किन डिसीज या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने या रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी जनावरांमध्ये रोगसदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदुपासून 5 कि.मी. परिसरात लसीकरणाचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने करावे व येत्या सप्ताहात लसीकरण 100 टक्के पुर्ण करावे.

 

लंपी स्किन डिसीज रोगनियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन बाधित क्षेत्रातील गोवर्गीय जनावरे यांना क्षेत्राबाहेर अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करुन, यासाठी पोलीस विभागाची मदत घेऊन एकाही जनावराची वाहतुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाधित पशु निदर्शनास आल्यास त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायत व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास द्यावी. पशुबाजारामध्ये यापुढे टॅगींग व लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय जनावरांची खरेदी, विक्री करु नये व याबाबत बाजार समित्यांनी काटेकोर कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी यावेळी संबधितांना दिल्यात.

 

 

लंपी स्किन डिसीज रोग हा अंत्यत संसर्गजन्य असल्याने आणि त्याचा प्रसार गोचिड-गोमाशा व डास यांच्यामार्फत होत असल्याने गावातील सर्व गोठ्यांचे शक्यतो एकाच दिवशी औषधाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याबाबत सर्व ग्रामसेवक यांनी निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, असे सांगून त्या म्हणाल्या, नंदुरबार जिल्ह्याच्या आंतरराज्य सिमेवर पशुसंवर्धन, परिवहन व गृह विभागाने संयुक्तरित्या गस्त ठेवून जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांचे नियंत्रण करावे. 28 दिवसांपुर्वी लंपी स्किन डिसीज लसीकरण झालेल्या जनावरांनाच जिल्ह्यात प्रवेश द्यावा. तसेच नगरपालिका क्षेत्रात मोकाट जनावरांना बंदिस्त करून त्यांचे लसीकरण व टॅगींग संबंधितांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून करुन घ्यावे.

 

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील जिल्ह्यातील लंपी स्किन डिसीजची सद्यस्थिती सांगताना म्हणाले की, जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असुन पशुपालकांनी जवळच्या दवाखान्यात संपर्क साधुन गोवर्गीय जनावरांचे त्वरीत लसीकरण करून प्रशासनास सहकार्य करावे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यातील १ हजार २५ बेघरांना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशांचे वाटप

Next Post

बसस्थानकाजवळ थरार : अचानक टोचन तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले

Next Post
बसस्थानकाजवळ थरार : अचानक टोचन तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले

बसस्थानकाजवळ थरार : अचानक टोचन तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add