Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील १ हजार २५ बेघरांना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशांचे वाटप

team by team
August 26, 2023
in राजकीय
0
तळोदा तालुक्यातील १ हजार २५ बेघरांना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशांचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी

आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतो. त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्की घरे शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत दिली जात आहेत,त्यामुळे निवाऱ्याच्या मुलभूत गरजेचा लाभ दऱ्याखोऱ्यातल्या लोकांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे प्रतिपादन, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज तळोदा येथे आदिवासी सांस्कृतिक भवनात घरकुल आदेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, तळोदा पंचायत समितीच्या सभापती लताबाई वळवी, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीष वाखारे, गटविकास अधिकारी पी.पी.कोकणी साहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. सायली चिखलीकर तसेच परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदिवासी विकास विभागाने योजनांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वंतंत्र टोल फ्री क्रमांक 1800 267 0007 सुरु केला गअसून लवकरच बहुसंवादी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजना, उपक्रम यांची सर्व प्रकारची माहिती मिळविणे अधिक सोपे व सुलभ झाले आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोल फ्री क्रमांकावरुन मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच विहीत मुदतीत उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या, आदिवासी समाजाचा बहुविध वारसा आणि संस्कृतीचे जतन करत त्यांना सक्षम करणे आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी चालना देणे, हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. मागील वर्षभरात आदिवासी विकास विभागाने घेतलेल निर्णय असोत किंवा पुढील काळात घेण्यात येणारे निर्णय, या प्रत्येकाचा उद्देश हा आदिवासी समाजाचा विकास हाच आहे. आदिवासीची लोकसंख्या जास्त प्रमाणात असलेले नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरुन विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत.

यावेळी तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीतील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल आदेशाचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. सायली चिखलीकर यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत

Next Post

पशुधनावरील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add