Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत

team by team
August 25, 2023
in राज्य
0
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत

नंदुरबार l प्रतिनिधी

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अल्प व्याजदरात 2023-24 या वर्षात कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हि. न. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेत स्वयंसहाय्यता बचतगट, प्रवासी, मालवाहू वाहन व ऑटोरिक्षा व्यवसाय यासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण व शहरी भागासाठी रु. 3 लाख मर्यादेत उत्पन्नाचा दाखला, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक, व्यवसाय प्रकल्प अहवाल, बँक पासबुकची छायाकिंत प्रत, सातबारा, घर नमुना आठ, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रचलित नियमानुसार आवश्यक कागदपत्रे, एक जामीनदार आदि कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.

अर्ज भरण्यासाठी https://mahashabari.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज वितरण प्रणालीद्वारे स्वत:चे खाते तयार करुन, संपूर्ण माहिती व आवश्यक ती कागदपत्रे जोडावित. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रीत प्रत कागदपत्रांसह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा कार्यालयास 5 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा करावी. असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. पाटील यांनी कळविले आले.

बातमी शेअर करा
Previous Post

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

Next Post

तळोदा तालुक्यातील १ हजार २५ बेघरांना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add