Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

team by team
August 25, 2023
in क्राईम
0
धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील पिंपरी येथील एका फॅक्टरी मालकाला धनादेश अनादरप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी. पाटील यांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 59 लाख रुपये दंड व एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पिंपरी येथील सिल्वर पॅक सोल्युशन या पॅकिंग पट्ट्या बनविण्याच्या फॅक्टरीचे प्रोप्रायटर नंदकुमार अशोक पाटील रा. म्हसावद ता. शहादा यांनी आपल्या फॅक्टरीतील विविध बांधकामासाठी म्हसावद ता. शाहदा येथील महावीर कृषी सेवा केंद्र या प्रतिष्ठानातून सन २०१४ मध्ये वेळोवेळी सुमारे ३२ लाख रुपयांचे लोखंड, तार, सिमेंट आदि साहित्य उधारीने खरेदी केलेले होते. ती उधारी चुकती करण्यासाठी त्याच वर्षी आरोपी नंदकुमार पाटील यांनी कृषी सेवा केंद्रचे मालक योगेश केसरीमल बेदमुथा यांना आयसीआयसीआय बँक खात्याचे अनुक्रमे ५ लख १५ हजार, १३ लाख ५० हजार व १४ लाख रुपयांचे तीन धनादेश दिले होते.

परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तीनही धनादेशांचे अनादर झाले होते.या प्रकरणी श्री. बेदमुथा यांनी आरोपी विरुद्ध सन २०१५ मध्ये शहादा येथील प्रथम वर्ग न्यायालयात तीन वेगवेगळी प्रकरणे दाखल करून दाद मागितली होती. या तीनही प्रकरणात न्यायाधीशांनी आज (दि.२४ ऑगस्ट) निकाल दिला असून धनादेश अनादर प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी नंदकुमार पाटील यांना प्रथम प्रकरणात ९ लाख रुपये दंड व ८ महिन्या साधी कारावास व दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणात प्रत्येकी २५ लाख रुपये दंड व एक वर्ष साधी कारावास अशी शिक्षा सुनाविली आहे. फिर्यादी तर्फे ॲड. ब्रजेश जायसवाल यांनी काम पहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

बिबट्याचा वृद्धावर हल्ला, म्हशीने झुंज देत वाचवले मालकाचे प्राण

Next Post

भोणे येथे टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू

Next Post
भोणे येथे टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू

भोणे येथे टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add