म्हसावद । प्रतिनिधी
केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम (२०२२-२७) अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण दि १७ आँगस्ट ते ३१ आँगस्ट पर्यत करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती नसल्याने शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहे.दैनंदिन अध्यापन करतांना त्याचा अतिरिक्त भार शिक्षकांवर पडत आहे.या पार्श्वभूमीवर निरक्षर व्यक्तीचा सर्वे करण्याचे काम शिक्षकांवर सोपवल्याने अशैक्षणिक कामाबाबत तीव्र असंतोष शिक्षकांमध्ये निर्माण झाल्याने या सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने घेतला त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या सर्वेक्षणावर बहिष्कार घातल्याची माहिती राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
शैक्षणिक सत्राच्या पहिल्या महिन्यात विदयार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती, सेतू अभ्यासक्रम पुर्व चाचणी, उत्तर चाचणी, निपुन भारत स्तरनिश्चिती पायभूत चाचणी हे सर्व पार पडले आणि आता निरक्षर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच शिक्षकांना निवडणूक विभागाकडून मतदारांची माहिती आँनलाइन करण्याचे काम दिले आहे.
अशी कामे नियमित शिक्षकांना दिल्यामुळे विदयार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचे वाईट परिणाम होत आहे.शिक्षकांचा शिकवण्याचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अनेक प्रकारच्या अशैक्षणिक कामात तसेच विविध माहिती ,सर्वेक्षण करण्यात व अँपवरील माहिती भरण्यात जात असल्यामुळे दर्जेदार शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम विविध सेवाभावी संस्था अथवा बेरोजगार युवकांना देण्यात यावे व शिक्षकांवर पडणारा अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन राज्य सल्लागार सुरेश भावसार ,राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील , जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया, सरचिटणीस अशोक देसले, कोषाध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष महेंद्र बैसाणे, अतिराप पवार, रत्नकांत भोईटे, लक्ष्मण परदेशी, जितेंद्र वळवी, संजय खैरनार, संजय देवरे ,शंकर वसावे, दारासिंग वळवी, भरत ठाकरे, उपसरचिटणीस उमेश कोळपकर, अजयकुमार शिंपी, संयुक्त सचिव अमृत पाटील, राहुल साळूंखे, कैलास लोहार, भरत पावरा, अनिल बाविस्कर, संघटक लोटन जगदाळे, बलदेव वसईकर, जूगनु वसावे, तालूका अध्यक्ष व सरचिटणीस शहादा महेंद्र चौधरी, रविंद्र बैसाणे , नंदुरबार राजेंद्र चौरे, विशाल पाटील तळोदा नितिन शिंपी, योगेश सोनवणे धडगाव कोमलसिंग पाडवी, केशव पावरा अक्कलकुवा भरत तडवी,आरिफ पिंजारी नवापूर मोना वसावे,सोनू ठाकरे यांनी केले आहे.








