नंदूरबार l प्रतिनिधी
काल चंद्रावर चांद्रयान ३ ने पहिलंच यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्मारक चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तसेच आनंद उत्साह साजरा करत एकमेकांना लाडू भरवून सामूहिक राष्ट्रगाण म्हणून भारत मातेचा जय घोष करण्यात आला आणि संपूर्ण जगात भारत देशाला सुवर्ण क्षणाचा आनंद मिळवून देणाऱ्या चंद्रयान 3 साठीच्या यशस्विते साठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या इस्रो तील वैज्ञानिकांचे मनपुर्वक अभिनंदन तसेच शतशत नमन करून संपूर्ण देशाचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अमृतकाळात यशाचा अमृतवर्षाव झाला आहे. आपण अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार ठरलो आहोत,तालुकाध्यक्ष संदीप परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ह्या प्रसंगी उपसभापती कृ.उ.बा.स. तळोदा हितेंद्र क्षत्रिय,तळोदा शहादा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,

अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख नुरा,कमेलश पाडवी,युवक तालुका अध्यक्ष दीपक वळवी,युवक शहराध्यक्ष गणेश राणे,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,अनिल पवार,संघटक राहुल पाडवी,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आदिल शेख,मुश्ताक अली कालुमिया,कुशन वळवी,शोएब पठाण,नईम बागवान,शारुख खान,मोहम्मद खान,उमर खान,रवींद्र पाडवी,शिवाजी पाडवी,युवराज चौहान,इमरान सिकलीकर,विकास क्षत्रिय,मितुल बत्तीसें,नितीन मिस्त्री,बबलू कोळी,दिनेश ब्राह्मणे,प्रकाश पाडवी,आनंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.








