Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नक्षत्र छंद मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी पाहिले लाईव्ह चांद्रयान लँडिंग

team by team
August 24, 2023
in राष्ट्रीय
0
नक्षत्र छंद मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी पाहिले लाईव्ह चांद्रयान लँडिंग
नंदूरबार l प्रतिनिधी
नक्षत्र छंद मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी  लाईव्ह चांद्रयान लँडिंग पाहिले यावेळी संचालिका चेतना पाटील यांनी ऐतिहासिक घटनेची शास्त्रीय माहिती दिली.
 दि. २३ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपासून चांद्रयान ३ बद्दल  मंडळाच्या संचालिका चेतना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, १४ जुलै ला २:३५ मिनिटांनी चांद्रयान ३ लॉन्च करण्यात आले.आणि तेंव्हा पासून या मोहिमेची माहिती वेळोवेळी मंडळाने विद्यार्थांना देण्यात आली. भारताची ही मोहीम आपल्या सगळ्यांसाठी खूप आभिमनची बाब आहे  चांद्रयान  ५:४५ पासून उतरताना   वेग कसा कमी होणार याची  शास्त्र शुध्द माहिती देत एक एक टप्पा कसा पार होणार हे सांगितले. त्यावेळी विक्रम लेंडर व प्रज्ञान रोवर तसेच रॉकेट हे सर्व मॉडेलच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.  संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार अनुभवला, त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे लाईव्ह बघितले ते पुढील प्रमाणे .
5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू झाली.
1.रफ ब्रेकिंग फेज
25×134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड  Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका  कमी करण्यात आला. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन  800 न्यूटनचा thurst यासाठी वापण्यात आला. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून  7.42 km उंचीवर आली. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेले. साधारण 690 सेकंदाची ही फेज होती.
 2. Atitude Holding फेज
“Atitude” not “Altitude” .. जेव्हा यान 7.42km उंचीवर आले तेव्हा ही 10 सेकंदाची फेज होती. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात आले. यात यान 3.48 km सरकेले आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात आले.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात आला.
3. Fine ब्रेकिंग फेज
175 सेकंदाची ही प्रक्रिया होती यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकले. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात आली. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात आली. यावेळी सगळे सेन्सर चेक केले गेले. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात आले म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात आले. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात आला.  योग्यवेळ पाहून यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू लागले.
  फेज ४
हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण झाले. Lander चंद्र भूमीला स्पर्श केला. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरले. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ होती. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर आले. Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढला आणि देशात जल्लोष झाला आणि नक्षत्र मंडळात ही खूप जल्लोष झाला.
5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.  ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे उभी म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे.
त्यांनी बोलताना सांगितले की पुढे मिशन आदित्य आणि शुक्रावरील मिशन सुद्धा अशाच पद्धतीने यशस्वी होतील.
याप्रसंगी आशापुरी फौंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील, अमोल परदेशी, दुर्गा राजुरे, वैभव पाटील, प्रतीक्षा पाटील, निलेश पाटील, दिपाली पाटील, आकांशा डोळे, रवींद्र डोळे, अथर्व, अर्णव, दर्शन, प्रीती, रिदम, आदी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नवसाक्षरता अभियान सर्वेक्षणावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा बहिष्कार

Next Post

अरे बापरे : दुधात भेसळ, नंदूरबार येथे प्रशासनाचे छापे, 334 लिटर दूध केले नष्ट

Next Post
अरे बापरे :  दुधात भेसळ, नंदूरबार येथे प्रशासनाचे छापे, 334 लिटर दूध केले नष्ट

अरे बापरे : दुधात भेसळ, नंदूरबार येथे प्रशासनाचे छापे, 334 लिटर दूध केले नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add