शहादा,l प्रतिनिधी
काळ्या कसदार जमिनीचा जिवंतपणा टिकून ठेवण्यासाठी जैविक खते व औषधांचा अधिक प्रमाणात वापर करावा,असे प्रतिपादन शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा विविध कार्यकारी सोसायटी मंदाणेचे चेअरमन किशोर मोरे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत आयोजित कृषी मेळावा प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शैक्षणिक प्रतिष्ठान मंदानेचे अध्यक्ष विजय यशवंत मोरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विविध कार्यकारी सोसायटी मंदाणेचे चेअरमन किशोर मोरे, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दिनेश पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल, श्री शिवाजी शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत मोरे, कृषी तंत्र विद्यालय मंदाणेचे प्राचार्य एस.एल.वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.मोरे म्हणाले, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत.उत्पादन वाढीसाठी जमिनीत रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी जैविक खते व औषधांचा वापर योग्य पद्धतीने करा.शेतकरी बांधवांनी कृषी दूतांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग शेतीत करावेत.यावेळी खविसंचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी नॅनो युरिया तंत्रज्ञान विषयक माहिती दिली.
ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत मंदाणे परिसरातील लोहारा,कर्जोत, असलोद, नागझिरी,पिंपर्डे येथील शेतकरी बांधवांसाठी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता.मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तरे झाली.यांत योग्य उत्तरे दिलेल्या शेतकरी बांधवांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी केले.प्रा.डॉ.भरत चौधरी यांनी जैविक खते याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कृषीदूत दुष्यंत पाटील यांनी केले.आभार कृषीदूत पियूष पवार यांनी मानले.मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा.चंद्रशेखर पाटील,प्रा.कुणाल पाटील यांच्यासह कृषीदूत प्रथमेश पाटील,गोकूळ सातपुते, युगांत पाटील, चंद्रशेखर चौधरी,तनय महाजन तसेच वाय.एच.मोरे कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.








