Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकनेते स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादनासह रोगनिदान शिबिर,व्यापारी संकुल उद्घाटन : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
August 13, 2023
in राजकीय
0
मणिपूर महिला अत्याचार घटनेच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून निषेध
नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आ.लोकनेते स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
लोकनेते,माजी आमदार स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात पत्रकार परिषद देण्यात आली त्यावेळी रघुवंशी बोलत होते.ते म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन कार्यक्रम.१०.१५ वाजता नंदुरबार तालुका विधायक समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन.१०.३० वा. छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान शिबिर.११.वा.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरातील महाराणा प्रताप व्यापारी संकुलाचे उद्घाटन.११.१५ वा.छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात विविध संस्थांच्या सर्व साधारण सभा होतील. त्याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
 कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक,आ.किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,माजी नगरसेवक कुणाल वसावे, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील उपस्थित होते.
विधायक समितीच्या शाळेला बाळासाहेबांचे नाव
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या दोन शाळांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या शाळांना नामकरण करण्यात आलेले आहे.शेजवा ता.नंदूरबार येथील शाळेला बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय तर सुतारपाडा ता.नंदूरबार येथील शाळेला गोविंद सखाराम मराठे यांचे नाव देण्यात आलेले आहे. नामकरण सोहळा नाट्य मंदिरात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख होईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले
बातमी शेअर करा
Previous Post

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add