नंदुरबार l प्रतिनिधी
येथील स्वा सै श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराथी विद्या मंदिरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत मेरी माटी मेरा देश हे अभियान दि. 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वा.से.श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराथी विद्या मंदिरात एक दिया शहीदोके नाम या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थांनी मातीचा दिवा (पणती) प्रज्वलित करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्याना स्वातंत्र्याचे महत्व तसेच आपल्या देशातील स्थानिक कारागिरांना किंवा कामगारांना आपल्याच भागात काम मिळाले पाहिजे. आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो तर या भारतमातेच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन आवश्यक आहे या सर्व बाबींचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले गेले.
शाळेतील सर्व विद्यार्थांनी मातीचा दिवा (पणती) प्रज्वलित केली तसेच इ ३ री वर्गसंघातील विद्यार्थांनी 75 या अंकाची प्रतिकृती मानवी साखळी तयार केली. इतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मातीचा दिवा घेऊन पंचप्राण शपथ घेतली.
यावेळी मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे, गुजराथी विभागाचे मुख्याध्यापक भद्रेशकुमार त्रिवेदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज वानखेडे,तुषार सोनवणे, सतिष पाटील,हरीश चौधरी,नितेश नाथजोगी, अशोक सोनार, विनोद बोरसे, शितल अजबे ,रागिनी व्यवहारे ,फकीरा माळी, राहुल सुर्यवंशी,शिवम बोरसे, निखील गोंधळी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी सहकार्य केले.








