धडगाव l प्रतिनिधी
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यात असलेले एक छोटेसे गाव राजबर्डी येथील रहिवासी इंजिनिअर कुणाल भरतसिंग पटले यांचा दोन वर्षांचा मुलगा ध्रुवांश यांची जगभरात प्रसिध्द असलेल्या अमेझॉन कंपनीचा जाहिराती साठी निवड झाली आहे. ध्रुवांशला मिळालेल्या दोन वर्षाच्या यशस्वी भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जगभरात नावाजलेल्या अमेझॉन कंपनीची नुकतीच जाहिरातीसाठी काही दिवसांपूर्वी इंदौर येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यात राजबर्डी येथील ध्रुवांश पावरा या छोट्याश्या दोन वर्षाचा बालकलाकाराने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने त्याची अमेझॉन सेलिंग साईट ऍडव्हर्टटायझिंगसाठी निवड करण्यात आली.अमेझॉन साईटवर ध्रुवांशची जाहिरात शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली.
अल्पवयात मॉडेलिंग क्षेत्रात ध्रुवांशला मिळालेल्या यशामुळे सातपुड्याचा अभिमान उंचावलेला आहे.
ध्रुवांशच्या अंगी लहानपणासून असलेल्या मॉडेलिंग गुणांचा त्याचा भविष्यातही योग्य वाटचालीला प्रोत्साहन देत राहू असे ध्रुवांश च्या आई अश्विनी पावरा यांनी म्हटले आहे.








