Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दीड लाख रुपये लुटचा दरोड्याचा बनाव फसला, तक्रारदारच निघाला आरोपी, दोघांना अटक

team by team
August 8, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे घरफोडी,  दोन लाखांचा ऐवज लंपास

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील व्यापाऱ्याचे पैसे घेऊन येणाऱ्या नोकराने दीड लाख रुपये लुटचा दरोड्याचा बनाव फसला असून तक्रारदारच आरोपी निघाला.स्थानिक गुन्हे शाखेकडून घटनेचा उलगडा झाला असून मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

याबाबत कल्पेश हस्तीमल जैन रा. वैशाली नगर, नळवा रोड, नंदुरबार यांचे नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय जवळ होलसेल किराणा दुकान असुन 7 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या दुकानावर काम करणारा इसम राजेंद्र हिरालाल माळी रा. सुंदर्द ता. जि. नंदुरबार यास कल्पेश जैन यांनी गुजरात राज्यातील कुकरमुंडा, वेलदा, निझर व वाकाचार रस्ता येथील किरकोळ किराणा दुकान, व्यापारी यांच्याकडून किराणा मालाचे उधारीचे पैसे घेवून येण्याबाबत सांगितले होते. त्याप्रमाणे राजेंद्र माळी याने कुकरमुंडा, वेलदा, निझर व वाकाचार रस्ता येथील किरकोळ किराणा दुकान, व्यापारी यांचेकडून सुमारे 1 लाख 30 हजार रुपये घेवून नंदुरबार येथे येत असतांना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील अडची ते लोणखेडा रस्त्यावर दुपारी 2.30 वा. सुमारास राजेंद्र माळी यास मोटार सायकलवर आलेल्या चार ते पाच अज्ञात इसमांनी अडवून त्यापैकी काळया रंगाचा टी शर्ट घातलेल्या इसमाने डोळ्यात मिरचीपूड भिरकावून पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली.

 

 

सदरची घटना राजेंद्र माळी याने तात्काळ त्याचे मालक कल्पेश जैन यांना कळविल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी लावण्याबाबत आदेशीत केले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीस ठाण्याचे 4 वेगवेगळे पथके तयार करुन रवाना करुन दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिले.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी करीत असतांना त्यांनी तक्रारदार राजेंद्र माळी यास काही प्रश्न विचारले असता तो देत असलेल्या उत्तरांमध्ये विसंगती दिसून येत होती म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना तक्रारदार याच्याबाबत संशय आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाला राजेंद्र माळी यास सखोल विचारपूस करणेबाबत आदेशीत केले.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेंद्र माळी यास विचारपुस केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणुन विश्वासात घेवून पुन्हा बारकाईने विचारपुस केली असता राजेंद्र माळी याने त्याचा साथीदार राजु देविदास महाजन (माळी), रा. लहान माळीवाडा, सिध्दार्थ चौक, नंदुरबार याच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव करुन सदरचा प्रकार घडवून आणलाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यास रोख रक्कमेबाबत विचारपूस केली असता ते पैसे राजु महाजन यांच्याकडे असल्याबाबत सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजु देविदास महाजन (माळी) रा. लहान माळीवाडा, सिध्दार्थ चौक, नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याच्याकडून 1 लाख 38 हजार 650 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले 70 हजार रुपये किमतीचे दुचाकी मोटार सायकल व राजेंद्र माळी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 40 हजार रुपये किमतीचे दुचाकी मोटार सायकल असा एकुण 2 लाख 48 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.

 

 

 

 

कौशल्यपूर्वक तपास व अनुभवाची सांगड घालून डोळ्यात मिरचीपूड टाकून दरोड्या सारखा मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्ह्याचा बनाव करणाऱ्या दोन्ही आरोपीतांना अवघ्या दोन तासात ताब्यात घेवून उत्कृष्ट कामगिरी करणान्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.

 

 

सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, सुनिल पाडवी, बापू बागुल, विशाल नागरे, पोलीस अंमलदार राजेंद्र काटके, अभय राजपुत, शोएब शेख, आनंदा मराठे हेमंत बारी, हेमंत सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन : सचिव डि. व्ही. हरणे

Next Post

जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवानासाठी मुदतवाढ

Next Post
जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवानासाठी मुदतवाढ

जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवानासाठी मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add