नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लायन्स क्लब तर्फे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त बाल रोग तज्ञ व आय. ए. पी. च्या शिशु पोषण या विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयंत शाह यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
सभागृहात आयोजित केले होते.
डॉ जयंत शाह यांनी आपल्या मार्गदर्शनात बाळाचे पहिले १ हजार दिवस कसे महत्वाचे आहे हे सांगताना कुपोषण कसे होते ते टाळण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती दिली.बाळाचा प्रथम आहार हा आईचे दूध असून तो सहा महिने तर अत्यावश्यक असून किमान २ वर्ष किंवा अधिक असू द्यावा असे आग्रही प्रतिपादन केले.आईचे दूध दीर्घकाळ घेणारे बालक हे भावनिक व बौद्धिक व आरोग्य दृष्टया अधिक संपन्न होते हे विविध उदाहरण
देवून पटवून दिले.
या नंतर उपस्थित स्त्री पुरुषांनी विविध प्रश्न विचारले त्याचे निरसन डॉ जयंत शाह यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन प्रोजेक्ट चेअरमन प्रग्नेश दवे अध्यक्ष शत्रूघ्न बालाणी, सचिव आश्विन पाटील, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी यांनी केले.या प्रसंगी डॉ.नूतन शाह, चंदर मंगलानी, शेखर कोतवाल, श्रीराम मोडक,लायन्स क्लब रिजन चेअरपर्सन हीना रघुवंशी , सर्व्हिस विकच्या डीस्ट्रिक चेअरपर्सन डॉ . तेजल चौधरी, फेमिना क्लब अध्यक्षा सीमा मोडक, डॉ.समीरा अहमद, वंदना
पाटील, किंजल दवे आदी उपस्थित होते.








