नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्रहार संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली वाडी, वस्ती, पाड्यातील शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयासमोर आदिवासी पारंपारिक तूरवाद्य वाजवून धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने दिशाभूल करून दुर्लक्ष करण्यात आलेले होते. यापूर्वीही वेळोवेळी पत्रव्यवहार, स्मरणपत्रे व भेटीचे वेळी तोंडी चर्चा झाली आहे. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नसल्याने प्राथमिक शिक्षकांत नाराजीचा सूर उमटला आहे.
जिल्हा परिषद नंदुरबारचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. प्रलंबित मागण्या लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले. प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांचे प्रहार शिक्षक संघटनेमार्फत पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. सीईओ सावनकुमार यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण होतील असेही आश्वासन दिले. प्रहार संघटनेच्या शिक्षकांनी आपले आंदोलन स्थगित केले.
सीएमपी प्रणालीने वेतन अदा करावे, वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे विलंबाने होणार्या पगार व आर्थिक देयके यामुळे गृह कर्ज, बँक हप्ते भरणा होताना शिक्षकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी वेळीच ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. राज्यपाल यांचा शासन निर्णय आदेश अनुसूचित क्षेत्रातील बोलीभाषेनुसार शिक्षकांना पदस्थापना देणे, बॉम्बे येथील उच्च न्यायालय औरंगाबाद येथील खंडपीठ 2023 ची रिट याचिकाकर्ता 42 शिक्षकांना रिक्त पेसा क्षेत्रात पदस्थापना देण्यात याव्यात, बोगस दिव्यांग शिक्षकांची जे. जे रुग्णालय मुंबई मार्फत तपासणी करणे, गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मिळणे, मेडिकल बिले मंजूर होऊनही रक्कम मिळावी, सेवापुस्तक अपडेट साठी शिबिर लावणे, शिक्षण सेवकांची नियमित वेतन फरक मिळावा, सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणे, भविष्य निर्वाह निधी दोन वर्षापासून पेंडिंग स्लीपा मिळाव्या, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करणे,
केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ आदेश रद्द करणे, शहादा तालुक्यातील वैजाली जिल्हा परिषद शाळा निर्लखन करूनही अद्याप पर्यंत इमारत न पाडणे, म्हणून न्याय्य हक्क मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, सुनील गावीत, सुरेंद्र वळवी, फुलसिंग वसावे, संदीप वळवी, भावसिंग गावित, जयंत गावित, नुरसिंग पाडवी, राकेश पाडवी, कृष्णा वसावे, विकास नाईक, अमित वसावे, प्रभाकर वळवी, मगनसिंग गावित, रघुनाथ गावित, नरेंद्र वसावे, रामदास वळवी, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आनंद पाटील, प्रहार अपंग क्रांती आंदोलन नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला, सुनील म्हेत्रे, प्रल्हाद साठे, आदी उपस्थित होते. भविष्यात न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार शिक्षक संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.








