नंदूरबार l प्रतिनिधी
योजनेच्या लाभ देतांना कोणीही कोणावर उपकार करत नाही. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते.जिल्ह्याच्या दुर्गम भागाच्या विकास करायचा असेल तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या झेंडा फडकावा असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
रविवारी सकाळी धडगाव येथे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जि.प सदस्य विजय पराडके, नगराध्यक्ष धनसिंग पावरा,नंदूरबार पालिकेचे माजी नगरसेवक कुणाल वसावे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके,उपसभापती भाईदास अगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्य संदीप वळवी,शहर प्रमुख दिलवरसिंग पावरा, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, जिल्हा महिला प्रमुख विद्या वळवी, मुख्यमंत्री जनकल्याण लोकसभा प्रमुख निलेश हिरे,सरपंच गणेश ठाकरे, गणपत ठाकरे, माधव पावरा,रेट्या वळवी, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी आदी उपस्थित होते.

बैठकीत जि.प सदस्य विजय पराडके,जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शिवसैनिकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा योजनेसाठी संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी जो ठराव केला असेल त्यानुसारच पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा.
प्रसंगी पं.स सदस्य भेमाबाई पावरा,डॉ.कांतीलाल पावरा, राजा पवार,महिला संघटक सुशीला पाडवी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार दिलवर यांनी केले.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
मेळाव्यात जि. प.सदस्य विजय पराडके यांची अक्कलकुवा विधानसभा संपर्क प्रमुखपदी तर नगरसेविका विद्या शिवराम वळवी यांची महिला जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी आ.तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.








