तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील १८ वर्षीय तरुणाने हातोडा पुलावरून उडी मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. उडी घेतलेल्या तरुणाच्या शोधासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होती.युवकाचा तापी नदीतून 35 तासांनी मृतदेह काढण्यात गोताखोराना यश आले.
बुधवार दि. २ ऑगस्ट साय. ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओजस सुनिल सोनार (वय १८ ) रा. जैन वाडी समोर असे पाण्यात उडी घेणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो जैन वाडी समोर कुटूंबीयांसह राहत होता. बुधवारी अचानक तो मोटार सायकल घेवून घरून निघून गेला. बराच वेळ झाला, परंतू घरी आलाच नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. ८ वाजे दरम्यान त्याचा मित्र साहिल जोहरी याने भ्रमण्वनीद्वारे ओजसने हातोडा पुलावरून पाण्यात उडी मारली असल्याचे सांगितले. सदर शब्द कानी पडताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला.
तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचे निकटीय असलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद सोनार, हीतेश सोनार, प्रमोद सोनार, योगेश सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विजय मराठे यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ओजस याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.असंख्य तर्कवितर्क लावण्यात येत होते.अखेर 35 तासांनी पट्टीचे पोहणारे रणजित पाडवी व प्यारेलाल पाडवी यांनी तळ गाठून ओजसचा मृतदेह बाहेर काढला.
नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कुकरमुंडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. काल सायंकाळी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.तळोदा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. निझर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








