नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये त्यांच्या गावामधील प्रशानासोबत सलोख्याची भावना वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासन व माजी सैनिक यांच्या सहभागाने कारगील विजय दिवसाचे औचित्य साधुन उद्या 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपन करण्यात यावे, असे आवाहन मेजर डॉ निलेश प्रकाश पाटील (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धुळे व नंदुरबार यांनी केले आहे.
वृक्षारोपन कार्यक्रमाचे छायाचित्र व त्याबाबतचा अहवाल माजी सैनिकांच्या नावासह व सरपंचच्या स्वाक्षरीनिशी धुळे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 27 जुलै 2023 पर्यंत सादर करावा. अव्वल कामगीरी करणाऱ्या पहिल्या दोन गावातील माजी सैनिक समुहाला रोख पारीतोषीक देण्यात येईल असेही प्रसिध्दी पत्रकान्वये डॉ. पाटील यांनी कळविले आहे.








