नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना 14 व्या हप्त्याचा लाभ वितरीत करण्यासाठी राजस्थान मधील सिकर येथे भव्य संमेलन आयोजित केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जुलै 2023 रोजी या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात पी.एम. किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरुन ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणेसाठी https://pmevents.ncog.gov.in ही वेबकास्ट लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही श्री. खांदे यांनी कळविले आहे.








