नंदुरबार l प्रतिनिधी
नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत सांघिक व वैयक्तिक गटात सोनखांब ता. नवापूर येथील कु. मोहिनी बळवंत गावित हिने गोल्ड मेडल पटकावित नंदुरबार जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नंदुरबार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन कु. मोहिनी गावित हिचा सत्कार केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम भैय्या रघुवंशी,शेतकी संघाचे बी.के. पाटील आदी उपस्थित होते. भोपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सर्वतोपरी मदत करण्याचे रघुवंशी यांनी सांगितले