नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त विसा खडायता पंच आणि बृहद गुजराती समाजातील महिला पुरुषांच्या उपस्थितीत रविवारी यमुनाजी महाराणी लोटिजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
मूळचे नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या नैरोबी देशात स्थायिक झालेले मनोज शशीचंद्र श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खडायता पंच आणि गुजराती समाजाचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.सकाळी प्रभात फेरी कोट्यार्क मंदिर येथून सोनार खुंट, बेहेरे चौक, सोनार गल्ली, मार्गावरून काढण्यात आली.त्यानंतर यमुनाजी महाराणी प्रतिमा डोक्यावर घेवून महिला भगिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या.
द्वारकाधीश मंदिर येथून डीजेच्या तालावर गरबासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या महिला अहिल्याबाई चौक, गणपती मंदिर, सोनार खुंट मार्गाने गुळवाडी येथील समाजाच्या वाडीत पोहोचले. समाजाच्या गुळवाडीत यमुनाजी महाराणी लोटीजी स्थापित करण्यात आल्या. याप्रसंगी तळोदा येथील नरेंद्र ओझा यांनी यमुनाजी यांचे 41 पद आणि सहस्त्रावर्तन कार्यक्रम संपन्न झाला.
यमुनाजी महाराणी लोटीजी महोत्सवासाठी नैरोबी निवासी मनोज श्रॉफ यांचे सहकार्य लाभले. महाप्रसादाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला. महोत्सव यशस्वीतेसाठी समस्त विसा खडायता पंच आणि बृहद गुजराती समाजातील महिला, युवक तसेच जेष्ठ नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.








