तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरासह तालुक्यातील विद्युत तारांना वृक्षांच्या फांद्यांचा विळखा पडला असून पावसाळ्यापूर्वी फांद्या तोडून,लोंबकलेले तार जीर्ण पोल बदलण्याची मागणी राष्ट्रवादी तर्फे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मान्सून सुरू होण्यापूर्वीच दरवर्षी विद्युत तारांमध्ये अडकत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे,अशा उपाययोजना करण्यात येतात. वादळी पावसामध्ये विद्युत तारांमध्ये झाडांच्या फांद्या अडकून विद्युत तारा तुटल्यास विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी महावितरणकडून फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येते. परंतु सध्या ही मोहीम अतिशय संथ गतीने शहरामध्ये सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश ठिकाणी रस्त्यावर विद्युत तारांना झाडांचा विळखा पडल्याचे चित्र दिसत आहे.
वीज पुरवठा करणाऱ्या तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होण्याचा धोकाही वाढला आहे.तरी महावितरणने चिनोदा रोड संपूर्ण परिसर,विजय किराणा,चर्मकार हट्टी जवळ पोल जीर्ण अवस्थेत आहे,तापिमाई नगर परिसर,टेलिफोन एक्चेंज जवळ (साईबाबा नगर),बँक ऑफ बडोदा,मारुती गल्ली पोल सरळ करणे तसेंच लोंबकलेले विद्युत तार खेचून प्रेशर (ब्याटम) देऊन होणारी संभाव्य दुर्घटना टाळावी ह्या साठी उप अभियंता विद्युत विभाग तळोदा तिरुपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तळोदा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे,मा.नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,सरचिटणीस महेंद्र पोटे,सहसंघटक मुकेश पाडवी,शहर उपाध्यक्ष नदीम बागवान,अनिल पवार,युवक उपाध्यक्ष देवेश मगरे,नईम बागवान, मोसीन खाटीक,प्रकाश पाडवी उपस्थित होते.
निवेदन अंती संबंधित अधिकारी तिरुपती पाटील यांनी 4 ते 5 दिवसात तालुक्यातील ग्रामीण भागातील लाईट संदर्भातील सर्वच समस्या ह्या मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील व तळोद्यातीलही राष्ट्रवादी तर्फे विद्युत तार असतील जीर्ण पोल असतील ज्या काही सूचना आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासित केले.