शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात
मयंक प्रदीप पटेल या श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा ता. शहादाच्या विद्यार्थ्यांने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लोणखेडा येथील जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री सातपुडा विद्यालयाचा विद्यार्थी मयंक प्रदीप पटेल याने दहावीत 96.80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तो विद्यालयासह तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.मयंक हा प्रा. प्रदिप नगीन पटेल (के. डी.गावीत आश्रमशाळा पावला ता.नंदुरबार) व सौ.योगिता प्रदिप पटेल (शिक्षिका कुबेर हायस्कूल म्हसावद) यांचा चिरंजीव आहे.त्याच्या या सुयशाबद्दल अध्यक्ष दीपक पाटील व पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक पी.जी.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.