Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 जून रोजी मुलाखतीचे आयोजन

team by team
May 30, 2023
in राज्य
0
कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 जून रोजी मुलाखतीचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 3 सप्टेंबर, 2023 रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी  14 जून,2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी  मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 19 जून ते 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत  सीडीएस कोर्स क्रमांक 61 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे बुधवार 14 जून,2023 रोजी  सकाळी 10.30 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी www.mhasainik.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन पीसीटीसी नाशिक सीडीएस-61 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 ईमेल pctcoic@yahoo.in  वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.गणेश पाटील हे मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित

Next Post

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग पाचव्यांदा मान

Next Post
कबचौ उमविकडून पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास अंकेक्षणात ‘अ’ दर्जा प्राप्त

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात 'अ' दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग पाचव्यांदा मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add