Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग पाचव्यांदा मान

team by team
May 30, 2023
in शैक्षणिक
0
कबचौ उमविकडून पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास अंकेक्षणात ‘अ’ दर्जा प्राप्त

शहादा –

 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मागील वर्षांचे (अॅकॅडमिक ऑडिट) शैक्षणिक अंकेक्षण झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास या जाहीर केलेल्या महाविद्यालयांच्या मानांकनामध्ये ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे शैक्षणिक अंकेक्षणात महाविद्यालयास सलग पाचव्यांदा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.

 

 

 

विद्यापीठातर्फे मिळणाऱ्या या मानांकनाकरिता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधून सक्षम नागरिक घडविण्याचे उपक्रम, विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, विविध परीक्षांचे निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, राबवित असलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, महाविद्यालयात उपलब्ध सोयी –  सुविधा, महाविद्यालयातील संशोधन उपक्रम, प्राध्यापकांनी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग व सादर केलेले शोधनिबंध, अद्ययावत ग्रंथालय सुविधा, सामाजिक उपक्रम, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान इत्यादी माहिती मागविण्यात आली होती.

 

 

 

 कुलगुरूंनी गठित केलेल्या समितीने विद्यापीठाला प्राप्त झालेले अर्ज व त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची खातरजमा करून महाविद्यालयास ‘अ’ दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाला नुकताच नॅककडून “अ” दर्जा प्राप्त झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील औषधनिर्माणशास्त्र शाखेतून नॅकला सामोरे जात “अ” दर्जा प्राप्त करणारे हे महाविद्यालय कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील  3.15 सीजीपीए प्राप्त करणारे एकमेव महाविद्यालय आहे. अॅकॅडमिक ऑडिटच्या या उत्तुंग यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या मंडळाचे अध्यक्ष दीपकपाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदपाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  मयूर दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे.

 

महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखून महाविद्यालयास सन्मानजनक ग्रेड मिळविण्यासाठी सहभाग दिल्याबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.

 

मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्‍या “थांबला तो संपला” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या विविध ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. विद्यापीठातर्फे शैक्षणिक अंकेक्षणात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आलेख उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळाव्यात अथवा महाविद्यालयाची गुणात्मक कामगिरी उत्तम रहावी यासाठी संस्थेची भूमिका नेहमीच आग्रही असते. याचा परिणाम निश्चितपणे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीवर होत असतो.

  •  दीपक पाटील
  • (अध्यक्ष – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक अंकेक्षणातून महाविद्यालयाला सलग पाचव्यांदा ‘अ’ दर्जा मिळवून महाविद्यालयाने गुणवत्ता टिकविण्यात सातत्य राखले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या सामूहिक व प्रामाणिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे नेहमीच गुणात्मक विकासासाठी प्रोत्साहन मिळत असते. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण घोडदौड सुरू असून विद्यार्थी हितास प्राधान्य देत सर्वच विद्याशाखांचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी यापुढेही सांघिक प्रयत्न सुरूच राहतील.

  • प्रा. मकरंद पाटील 
  • समन्वयक – शैक्षणिक व सामान्य प्रशासन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा

महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा जोपासण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाकडून मिळणारे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची समाधानकारक कामगिरी, महाविद्यालयात विविध उपक्रम राबविताना असणारी सांघिक भावना यामुळे महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढेही महाविद्यालयाचे नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

  • डॉ. एस. पी. पवार
  • प्राचार्य –पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा)
बातमी शेअर करा
Previous Post

कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 14 जून रोजी मुलाखतीचे आयोजन

Next Post

‘कुसुम’ ने आणूया पाणी, शेतं पिकवू सोन्यावाणी

Next Post
‘कुसुम’ ने आणूया पाणी, शेतं पिकवू सोन्यावाणी

‘कुसुम’ ने आणूया पाणी, शेतं पिकवू सोन्यावाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add