Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजातर्फे अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहिताचे ठराव मंजूर

team by team
May 20, 2023
in सामाजिक
0
मराठा समाजातर्फे अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहिताचे ठराव मंजूर
नंदुरबार-
हुंडा पद्धत बंद करणे, लग्नाच्या आधी असलेली प्रिवेडींग शुटींग/फोटोग्राफी बंद करणे, लग्न पत्रिकेत ठरलेल्या वेळेतच लग्न लावणे अशा अनेक अनिष्ठ प्रथांना फाटा देत येथील सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळातर्फे समाजहिताचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, मंगळ बाजार, नंदुरबार येथे मराठा पंच मडळाची सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद लक्ष्मण मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत माजी अध्यक्ष श्रावण मराठे, मोहन मगन मराठे, योगेश मराठे, मंडळाचे सचिव रमेश मराठे, गोरख मराठे, भाऊसाहेब मराठे, अर्जुन मराठे, मनोहर मराठे, अरुण मराठे, भगवान मराठे, कैलास मराठे, मोतीलाल मराठे, जगदिश जिभाऊ, राजेंद्र मराठे, लक्ष्मण मोतीलाल मराठे, प्रकाश मराठे, धनराज मराठे, भरत मराठे, दिनेश मराठे, पावबा मराठे, पावबा मिस्तरी, योगेश मराठे आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहित लक्षात घेता विविध ठराव मंजुर करण्यात आले. त्यात हुंडा पद्धत बंद करणे, साखरपुड्यात १० पेक्षा जास्त साड्या न देणे, साखरपुड्यात व लग्नात कोणालाही नारळ किंवा वाट्या न देणे/लावणे, लग्नपत्रिका ५० कि.मी.च्या जास्त अंतर असल्यास व्हॉट्सअप किंवा फोन करुन आमंत्रण देणे, पत्रिकेसोबत भाडे देणे बंद करणे, लग्नाच्या आधी असलेली प्रिवेडींग शुटींग/फोटोग्राफी बंद करणे, हळद लावण्याच्या दिवशी पाया पडण्याची प्रथा बंद करणे. (फक्त वराच्या आई-वडीलांचेच पाया पडणे), लग्नात कितीही आहेर केला तरी त्यास वापस कोणतीही वस्तु किंवा साडी (आहेर) देवू नये, लग्न पत्रिकेत ठरलेल्या वेळेतच लग्न लावणे.
उशीर करु नये, मूळ लावणे पद्धत बंद करणे यासारखे समाज हितासाठी, समाज उन्नतीसाठी नियमावली सर्वानुमते लागू करण्यात आली. सर्व समाज बांधवांनी सदर नियमावलीचे पालन करुन समाजाचा नावलौकीक वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रविंद्र मराठे (सर) यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : 2000 रूपयांच्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँकेने घेतला नोटा मागे घेण्याचा निर्णय

Next Post

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी  -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add