Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
May 20, 2023
in राज्य
0
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी  -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l  प्रतिनिधी

‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागानी योजना व लाभार्थ्यांची माहिती त्वरीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज  दिले आहेत.

 

  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, लक्ष्मण पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, सर्व  विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून विविध योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याने सर्व विभागानी आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, पात्र लाभार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह अचूक माहिती गुगल शीट वर त्वरीत सादर करावी.

 प्रत्येक विभागाने दररोज केलेल्या कामाचा अहवाल गुगल शिटवर उपलब्ध करुन द्यावा. माहिती भरण्यासाठी आपल्या विभागातील जबाबदारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत तालुकास्तरावर कार्यक्रम राबवितांना मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी. तालुकास्तरावर मोठया प्रमाणात लाभ देतांना  स्थानिक लोकप्रतिनिधीना सहभागी करुन त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. सर्व तहसिलदारांनी जातीचे दाखले, नॉन क्रिमिलर, सातबारा, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड वाटप करण्यासाठी नियोजन करावेत. प्रत्येक तालुकास्तरावर हा कार्यक्रम होणार असल्याने यासाठी सर्व विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

 

जत्रा शासकीय योजनांची उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम  तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजातर्फे अनिष्ठ प्रथांना फाटा देत समाजहिताचे ठराव मंजूर

Next Post

जिल्हा मजूर फेडरेशनचा सभापतीपदी अंकुश पाटील तर उपसभापतीपदी रमेश भोई बिनविरोध

Next Post
जिल्हा मजूर फेडरेशनचा सभापतीपदी अंकुश पाटील तर उपसभापतीपदी रमेश भोई बिनविरोध

जिल्हा मजूर फेडरेशनचा सभापतीपदी अंकुश पाटील तर उपसभापतीपदी रमेश भोई बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add