Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चार आठवड्यात ६० लाखाची कर वसुली

लिपीक सैय्यद अली यांचा गौरव

team by team
May 18, 2023
in राजकीय
0
चार आठवड्यात ६० लाखाची कर वसुली

नंदुरबार  l

येथील नगर पालिकेच्या थकबाकीदारांकडे जावून केवळ चार आठवड्यात ६० लाख रुपयांची थकित कर वसुली केल्याने पालिकेचे वसुली लिपीक सय्यद वाजीदअली मुस्ताक अली यांचा पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

नंदुरबार शहरातील मालमत्ताधारक यांनी सन २०२२-२३ अखेरपर्यंत मालमत्ता कर व इतर कर भरलेला नसल्यामुळे मालमत्ता कर वसुलीबाबतची मोहिम दि.१३ मे २०२३ पर्यंत सुरु ठेवणेबाबत विभागीय आयुक्त नाशिक यांचे निर्देश होते. त्यानुसार वसुली विभागातील वसुलीचा आढावा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी घेतला असता नगर परिषदेची वसुली अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे जे थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस पुन्हा देणे तसेच वृत्तपत्रात जाहीर सुचना प्रसिदधी करुन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आलेले होते. मालमत्ता कर वसुलीची नोटीस मोहिम १३/४/२०२३ रोजी पासून कार्यवाही सुरु करण्यात आली होती.

नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या नोटीसच्या मुदतीनंतर जे मालमत्ताधारक थकबाकीदार आहे, अशा मालमत्ता सील करुन जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. दरम्यान, पालिकेचे वसूली लिपीक सय्यद वाजीदअली मुस्ताक अली यांनी दि.१३/४/२०२३ ते दि. १२/५/२०२३ या कालावधीत एकूण ५९ लाख ३१ हजार ८२७ रुपयांची एव्हढी रक्कम थकबाकीदार यांच्याकडून वसुल केलेली आहे. दरम्यान, सय्यद यांनी त्यांच्या भागातील मालमत्ता कर व इतर कर वसुलीचे काम समाधानकारकरित्या पूर्ण केल्याने पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते सय्यद यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच भविष्यातही आपण सेवेत असेपर्यंत यापुढे चांगले काम करावे, अशी अपेक्षाही सिंह यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज निवड

Next Post

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

Next Post
रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add