म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुक १८ मे रोजी होणार आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी पथ संचलन संपूर्ण गावांतुन काढण्यात आली.
१८ मे रोजी म्हसावद हद्दीतील ग्राम पंचायतीच्या सदस्य च्या पोट निवडणूक कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद गावातील मच्छी बाजार,मुख्य बाजार पेठ,डॉ..बाबासाहेब आंबेडकर चौक,राम मंदिर चौक,अहिल्याबाई चौक, ग्रामीण रुग्णालय चौक,कुबेर हायस्कूल परिसर,राणीपुर फाटा,पोलिस ठाणे या परिसरात दंगा काबू योजना परिसरात पथ संचलन करण्यात आले.यात पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, १५ पोलिस कर्मचारी,एक आर.सी.पी, प्लाटून शहादा हे उपस्थित होते.








