नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पाचोराबारी नवी दिल्ली येथे विना परवाना मोठमोठ्याने गाणे लावून वाद्य वाजविल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी नवी दिल्ली येथे लग्न हळदीच्या कार्यक्रमात विना परवाना वाहनावर (क्र.एम.एच.१८ एम ४९९६) स्पिकर लावून मोठमोठ्या गाणे वाजवून नाचतांना आढळून आले. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी काटकर यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात हिरालाल सेखा राठोड व पंडीत धुडकू कोकणी यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३८ (१) (क) १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पानाजी वसावे करीत आहेत.








