नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते नवापुर रोडावर खांमगाव शिवारातील सनसिटी जवळ बस, मोटारसायकल व कारचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदुरबार तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील सनसिटी वसाहती समोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवापूर मोलगी बस ( क्र. एम. एच. 40, एन.9027) या बसवरील चालकाने त्याचे ताब्यातील बस रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवुन मोटार सायकल ( क्र.एम.एच.39, आर.7578) ला धडक दिल्याने मोटार सायकल स्वार निकम टेटग्या वसावे (वय 18 रा. अस्तंभा / शिसा ता. अक्राणी याचा जागीच मृत्यू झाला.
तर संदीप टेटग्या वसावे रा. अस्तंभा / शिसा ता. अक्राणी याला गंभीर दुखापत झाली.दरम्यान या नंतर बस ने बोलेरो कार ( क्रं. एम. एच. 18- बी.सी. 5614) ला धडक दिली.
मोटरसायकल व कारचे नुकसान करून खबर n देता चालक फरार झाला.याप्रकरणी मगन नाऱ्या गावीत रा. अस्तंभा /शिसा ता. अक्राणी ह.मु. गणेशनगर जैन पेट्रोलपंपाजवळ नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध भादवी कलम भा. दं. वि. क. 304 (अ) 279, 337, 338, 427, मो. व्हि ॲक्ट कलम 184,134/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोसई सुरेश सोनवणे करीत आहेत.
दरम्यान अपघातानंतर गंभीर झालेल्या युवकाला स्थानिक सनसिटी वसाहतीतील नागरिक व नंदूरबार शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मदत कार्य करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघात बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.








