Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदा येथील महिलेचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

team by team
May 3, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : पातोंडा येथे युवकाचा आढळला मृतदेह ?,  शेतात आढळला महिलेचा मृतदेह

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदूरबार तालुक्यातील ३५ वर्षीय महिलेचा कटर निर्घृण खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, १ मे रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील यांच्या शेतात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आली होती.

 

घटनास्थळी पोलीस पथकाने मृतदेहाची पाहणी केली असता, साडी व ब्लाउज परिधान केलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेली होती. तसेच मृत महिलेच्या गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून बाजरी पिकाचे शेतात फेकुन दिले होते. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मयताची ओळख पटविण्यसाठी व गुन्ह्यात सहभागी असलेल्या अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने घटनास्थळाच्या आजु बाजुच्या परिसरात व गावात मयताचा फोटो व हातावर गोंदलेले फोटो दाखवित होते. तर एक पथक घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेल्या साखर कारखान्यात जावून माहिती घेत होते. मयताचा फोटो व हातावर गोंदलेले फोटो समाज माध्यमांवर देखील प्रसिध्द करण्यात आला, जेणे करुन मयताची ओळख पटु शकेल परंतु तरी देखील यश मिळत नव्हते.समाज माध्यमावर मयताचा व मयताच्या हातवर गोंदलेले फोटो प्रसिध्द केल्यानंतर दि.1 मे रोजी दुपारी 3 वा. सुमारास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना सुज्ञ नागरिकाने कळविले की, समाज माध्यमावर मयत महिलेचा जो फोटो प्रसिध्द करण्यात आलेला आहे ती महिला कोळदा येथील आहे, परंतु बरीच वर्षे झाली ती कोळदा गावी आलेली नाही म्हणून मयत महिला ही निश्चीत तिच असेल असे नाही अशी त्रोटक माहिती मिळाली.

 

मिळालेली माहिती जरी त्रोटक असली तरी सुतावरून स्वर्ग गाठणे या म्हणीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कोळदा येथे जावून मयत महिलेच्या वडीलांची भेट घेतली व त्यांच्याकडे विचारपूस केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पथकाने मयताच्या वडीलांना मयताच्या हातावर गोंदलेले फोटो दाखविले असता त्यांनी ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोळदा येथील महिलेचा खून त्याच गावातील येथील राहणारा बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल अशांनी मिळून केला आहे. सदरची माहिती पोलीस अधीक्षक . पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगून दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांच्या बोलण्यात असलेली तफावत पोलिसांनी लक्षात आणून दिली.ताब्यात घेण्यात आलेले बन्या सन्या पाडवी रा. कोळदा, ता. जि. नंदुरबार, परान ऊर्फ प्रविण ऊर्फ पिंट्या धडू भिल रा. कोरीट, ता. जि. नंदुरबार यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. खूनासारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमलदारांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला बचत गटांनी शेळी गट योजनेसाठी अर्ज सादर करावेत

Next Post

दरीत पडलेल्या इसमाला तब्बल 36 तासाहून अधिक काळानंतर बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश

Next Post
दरीत पडलेल्या इसमाला तब्बल 36 तासाहून अधिक काळानंतर बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश

दरीत पडलेल्या इसमाला तब्बल 36 तासाहून अधिक काळानंतर बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add