Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार, शहादा व नवापूर बाजार समितीच्या निवडणुकीत ९७.६० टक्के विक्रमी मतदान

team by team
April 29, 2023
in राजकीय
0
नंदुरबार, शहादा व नवापूर बाजार समितीच्या निवडणुकीत ९७.६० टक्के विक्रमी मतदान

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा व नवापूर या कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नंदुरबार बाजार समितीसाठी सर्वाधिक ९७.८७ टक्के, नवापूर बाजार समितीसाठी ९७.६६ तर शहादा बाजार समितीसाठी ९६.८२ टक्के मतदान झाले आहे.तिघा बाजार समितींसाठी सरासरी ९७.६० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. दरम्यान, उद्या दि.२९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असून मतदार राजा कुणाला कौल देतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यातील ६ बाजार समितीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.यात तळोदा, धडगाव व अक्कलकुवा बाजार समित्या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. नंदुरबार, शहादा व नवापूर अशा तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही.

 

 

यामुळे सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अवघे ४० टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीने सत्तरी पार केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत नंदुरबार बाजार समितीसाठी ९२ टक्के, नवापूर बाजार समितीसाठी ९३ टक्के तर शहादा बाजार समितीसाठी ९१ टक्के असे मतदान झाले होते. तर त्यानंतर सायंकाळी देखील मतदारांमध्ये उत्साह होता. यामुळे तिघा बाजार समितींसाठी विक्रमी मतदान झाल्याचे दिसून आले.

 

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३७ उमेदवारांनी आपले भवितव्य आजमाविले आहे. एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. नंदुरबार बाजार समितीसाठी एकूण २ हजार ७२७ मतदारांपैकी २ हजार ६६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामुळे ९७.८७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले.

 

 

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी चौरंगी लढत झाली असून ९६.८२ टक्के मतदान झाले. एकूण २ हजार ८३७ मतदारांपैकी २ हजार ७४७ मतदारांनी मतदान केले.तर नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३९ उमेदवारांनी आपले भवितव्य आजमाविले आहे. एकूण १ हजार ४५९ मतदारांपैकी १ हजार ४२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९७.६६ टक्के इतके मतदान झाले आहे. दरम्यान आज मतमोजणी करण्यात होणार असून मतदार आता नेमके कोणाच्या बाजूने कौल देतात? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे.

 

 

नंदूरबारात दोघा पॅनलमध्ये सरळ लढत
नंदूरबार बाजार समिती निवडणूक पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिष्ठेची केली होती. डॉ.विजयकुमार गावित पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल तर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल अशा दोघा पॅनलमध्ये सरळ लढत होती.

 

 

शहाद्यात चौरंगी लढत
शहादा बाजार समितीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अत्यंत चुरशीशी निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शहाद्याकडे लागून आहे सत्ताधारी दीपक पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील व शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनल दिल्याने चौरंगी लढत झाल्याने मतदारांनी आपला कौल कोणाला दिला याचा फैसला उद्या मतमोजणी अंती स्पष्ट होईल.

 

 

नवापूर बाजार समितीत दोघे पॅनल सामोरा समोर
नुकत्याच तालुक्यातील डोकारे साखर कारखाण्याची निवडणुकीत भरत गावीत यांच्या पॅनलने आ.शिरीषकुमार नाईक यांचा पॅनल चा सुपडा साफ केला होता.त्यामुळे बाजार समिती निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. याठिकाणी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत व आ.शिरीषकुमार नाईक यांच्या पॅनल मध्ये सरळ लढत पाहायला मिळाली. बाजार समितीवर आ.शिरीषकुमार नाईक यांच्या गटाची सत्ता आहे.त्यामुळे नवापूर बाजार समितीत कोण बाजी मारत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा युवा पुरस्कार 2022 मुकेश पाटील यांना जाहीर, 1 मे, महाराष्ट्र दिन रोजी पालकमंत्र्याच्या हस्ते वितरण

Next Post

बाजार समितीवर शिवसेनेचाच झेंडा;आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा

Next Post
बाजार समितीवर शिवसेनेचाच झेंडा;आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा

बाजार समितीवर शिवसेनेचाच झेंडा;आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add