नंदुरबार l प्रतिनिधी
एप्रिल महिना अखेर आला असतांनाही अद्यापही पालिकेचे अपेक्षित कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कर भरणा करण्याचे आवाहन करुन देखील नागरिकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. अद्यापही मालमत्ताधारकांनी कर भरणा केलेला नाही. यामुळे पालिकेकडून आता जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. अद्याप गेल्या वर्षाचा तब्बल १७ कोटी ५० लाख रुपयांहून अधिकचा मालमत्ता कर व इतर कर थकबाकी असून पालिकेकडून होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नंदूरबार पालिकेने कर भरणा करण्याचे आवाहन करुन देखील नागरिकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नंदुरबार पालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरातील १७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये शासकीय मालमत्ता व इतर मालमत्ता, पाणीपट्टी, घरपट्टी आदी करांचा समावेश आहे. वारंवार आवाहन करुन देखील कर भरणा होत नसल्याने आता कर वसुलीसाठी नंदुरबार पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
अवघ्या सव्वा सहा कोटींची वसुली झाल्याने उर्वरित वसुलीसाठी पालिकेने जप्तीची कारवाई सुरु केली आहे. थकबाकीदार असणाऱ्या मालमत्ताधारकांना यापूर्वीच नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही नगर परिषदेचा कर भरलेला नाही अशा मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामुळे मालमत्ता कर व इतर कर थकबाकी असेल त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे भरणा करावा अन्यथा संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सदर मालमत्ताधारकांकडून दंडात्मक रक्कम व नोटीस फी देखील नियमानुसार वसूल करण्यात येणार आहे. यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी असेल त्यांनी तात्काळ कर भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी केले आहेे.








