नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अल्पवयीन मुलगी परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली असता ती परत घरी आली नव्हती याबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अवघ्या २४ तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला लावल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १९ रोजी नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी भिलाटी परीसरात राहणारी अल्पवयीन मुलगी संगिता राजु वळवी ( वय १० वर्षे ) ही दुपारी ३ वाजेच्या सुमारास परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली असता ती परत घरी आली नाही तिचा तिचे पालकांनी नातेवाईकांकडे व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही म्हणुन तीचे अपहरण झाल्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ईसमाविरोधात दि.२० रोजी कालीबाई रोहीदास पाडवी यांनी फिर्यद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता . या मुलीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर गुन्हयाचे तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील यांना मार्गदर्शन करुन तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन घटनास्थळी तात्काळ भेट देवुन विचारपुस केली. त्यादरम्यान घटनास्थळाचे आजुबाजुचे साक्षीदार यांना व गुप्त बातमीदार यांचे कडे विचारपुस करुन सदर गुन्हयातील अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे गोळा करणे पोलीसांनी सुरु केले.पोलीसांनी नंदुरबार शहर व परीसर अपहृत मुलीचे नातेवाईक व मुलीस ओळखणारे यांचे मदतीने पिंजुन काढुन सदर अपहत मुलीचा गुन्हा दाखल झालेनंतर २४ तासाचे आत शोध घेतला.व सदर अपहृत मुलीचा शोध घेवुन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदर गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार खेडकर , सपोनि नंदा पाटील , पोहेकॉ कृष्णा पवार , पोहेकॉ रविंद्र पवार , पोना अमोल जाधव , पोकॉ संदीप गायकवाड यांनी केला आहे .