शहादा l प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कृषी महाविद्यालयात समता पर्व उपक्रम राबविण्यात आला.
राज्याचे समाज कल्याण सचिव सुमित भांगे व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे व विभाग प्रमुख (विस्तार व सेवा) डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या संकल्पनेतुन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय शहादा येथे विद्यार्थ्यांच्या सहभागाने सलग वाचन प्रेरणा दिवस व वकृत्वस्पर्धा असे उपक्रम राबविले.
शहादा समतादुत (तालुका समन्वयक) जयश्री कढरे व करणकाळे हिम्मत यांनी प्रबोधनातून विचार मांडले आणि जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र विषयी माहिती दिली. त्याच बरोबर समान संधी केंद्र सदस्य महेंद्र पाटील यांनी शिष्यवृत्ती संबंधी माहिती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. रुपेश पाटील यांनी प्रस्तावना करून परिचय दिला.या सर्व कार्यक्रमास प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल व प्राध्यापक, शिक्षकेतर वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.








