नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवशी तब्बल ३३ जणांनी अर्ज मागे घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांचा स्थानिक नेत्यांचा प्रयत्नाने अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली.त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांचा बिनविरोध निवडीचा पायंडा यंदाही कायम राखण्यास यश आले आहे.तसेच धडगाव बाजार समितीही बिनविरोध झाली आहे.तर अक्कलकुवा येथील १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.त्यामुळे नंदूरबार, शहादा व नवापूर येथे चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती.येत्या २८ एप्रिल रोजी मतदार घेण्यात येणार होते. यासाठी संस्था,ग्रामपंचायत, व्यापारी,हमाल मपडी अशा विविध जागांसाठी तब्बल ८६ जणांनी अर्ज दाखल केले होते.प्रथमच येवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीकडे तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून होते.गुरुवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती.या दरम्यान ३३ जणांनी आपले अर्ज माघार घेतल्याने १८ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे. सोसायटी मतदार संघ.१) सुरेश झगडू इंद्रजीत २) अमृत तुकाराम गायकवाड ३)योगेश प्रभाकर चौधरी ४) कल्पेश धरमदास माळी ५) प्रकाश श्रीराम माळी ६) रेखा रमेश माळी ७) हितेंद्र सरवण क्षत्रिय ८) कल्पना रघुवीर चौधरी ९) लताबाई प्रल्हाद मराठे १०) शशिकांत जगन्नाथ वाणी ११) आमदार राजेश उदेसिंग पाडवी. ग्रामपंचायत मतदार संघ.१) नीरज सुरेश पाटील २) अमोल प्रल्हाद भारती ३) रोहिदास शांमा पाडवी ४) सत्तरसिंग भिमसिंग राजपूत.
व्यापारी मतदार संघ.१) गौतम अनोपचद जैन २) निखिलकुमार नेमीचंद तुरखीया.
हमाल मापाडी मतदार. रवींद्र शंकर गाडे या प्रमाणे आहेत.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार राजेश पाडवी,माजी आमदार उदेसींग पाडवी,आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,माजी नगराध्यक्ष भरत माळी, अनुप उदासी ,भास्कर मराठे,महेंद्र गाडे,योगेश मराठे,संदीप परदेशी यांनी ठोस प्रयत्न केले होते.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस , शिवसेना शिंदेगट व ठाकरे गट तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना व व्यापाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो असे आ. राजेश पाडवी यांनी सांगितले.
दरम्यान धडगाव बाजार समितीही बिनविरोध झाली आहे.तर अक्कलकुवा येथील १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.त्यामुळे नंदूरबार, शहादा व नवापूर येथे चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.








