नवापूर | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील नवीन सावरट या गावाजवळ अवैधरित्या वाहनांमध्ये केमिकल ऑईल भरण्याचं काम सुरू असल्याचं सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पुरवठा विभाग व जिल्हा प्रतिनिधी भारत पेट्रोलियम मनमाड यांच्या संयुक्त पथकाने बायो डिझेल ऍड केमिकल या पंपावर कारवाई करत सीलबंद केले आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सावरट गावाजवळ एकता हॉटेल शेजारी पलक बायो डिझेल अँड केमिकल हा पंप अवैधरित्या विनापरवाना सुरू होता.सदरचा प्रकार सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार मीनल करणवाल यांच्या लक्षात आला यानंतर त्यांनी लागलीस पलक बायो डिझेल पंप व जागेची तपासणी केली व सदरचा बायो डिझेल पंपचे पाच विक्री पॉईंट बंद करण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार आदेशानुसार नवापुर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बी.पी.सी.एल. कंपनीचे सहायक व्यवस्थापक अमित कुमार राय,पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम अक्षय लोहारे, तलाठी दासू गावित यांच्या पथकाने सदर बायो डिझेल अँड केमिकल पंप सील करण्यात आला आहे.अधिकार्यांच्या या धडक कारवाईने नवापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पलक बायोडिझेल ऍण्ड केमिकल्स , नवीन सावरट ता . नवापूर या ठिकाणी अवैधरित्या वाहनांमध्ये केमिकल ऑईल भरण्याचे काम सुरु असल्याचे सहायक जिल्हाधिकारी , नंदुरबार यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पुरवठा विभाग व जिल्हा प्रतिनिधी , भारत पेट्रोलियम, मनमाड यांच्या संयुक्त पथकाने आज रोजी कारवाई केली . त्यामध्ये विक्री करण्यात येत असलेल्या ऑईलचे नमुने घेण्यात आले आहे व पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत . पंपाच्या परिसरात भूमिगत टाक्यांना सिलबंद करण्यात आले आहे . तसेच पंपावरील पाच विक्री पॉईंट सिलबंद करण्यात आले आहेत अशी माहिती नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.