Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभिनव उपक्रम: गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच टिफिन सेवेचा शुभारंभ

team by team
April 1, 2023
in सामाजिक
0
अभिनव उपक्रम: गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच टिफिन सेवेचा  शुभारंभ
नंदुरबार l प्रतिनिधी
 शहरातील गरजू जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली विनामूल्य घरपोच टिफिन सेवा खरोखरच कौतुकास्पद असून सदर कार्य पुढे सुरू राहावे यासाठी शुभेच्छा देत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मीनल करणवाल यांनी ज्येष्ठ नागरिक घरपोच टिफिन सेवा शुभारंभ प्रसंगी सांगितले.
   शहरातील एम.एल. टाऊन जवळील स्वागत भोजनालय येथे ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समिती मार्फत शहरातील गरजू जेष्ठ नागरिकांना विनामूल्य घरपोच टिफिन सेवा या कार्याच्या शुभारंभ श्रीराम नवमी निमित्त सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्ष खाली करण्यात आला . तर शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.जी. नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ॲड. राजेंद्र पंडित, डॉ तेजल चौधरी, सुलभा महिरे, जयप्रकाश अग्रवाल, सुरेश अग्रवाल, बारकू पाटील, आत्माराम इंदवे, श्रीनिवास चौधरी, अजय भाईवारा, रतनलाल अग्रवाल ,संजय अग्रवाल ,गौरव अग्रवाल, मीनल मसावदकर आदी उपस्थित होते.
   ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समितीमार्फत शहरातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधार नाही किंवा त्यांचे पाल्य कामानिमित्त बाहेर आहेत अशा व इतर अडचणी आहेत अशा गरजू जेष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे या उद्देशाने सदर टिफिन सेवा सुरू करण्यात आली आहे या टिफिन सेवेत ५ पुरुष १३ महिला असे एकूण १८ ज्येष्ठ नागरिकांना टिफिन सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्यांच्या घरी जाऊन खरोखर गरज असलेल्या व्यक्तींना निवडण्यात आले आहे. दानशूर व्यक्ती ही सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी मदत करीत राहतील अशी माहिती  समितीचे सचिव बारकू पाटील यांनी दिली आहे.
    ज्येष्ठ नागरिकांच्या या घरपोच टिफिन सेवेसाठी आई-वडील यांच्या वाढदिवस ,स्मृतिदिन, लग्नाच्या वाढदिवस किंवा अन्य शुभ कार्यानिमित्त कोणीही यासाठी मदत करू शकतात. अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल
यांनी दिली आहे. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश अग्रवाल यांनी केले सूत्रसंचालन आत्माराम इंदवे यांनी केले बारकू पाटील यांनी आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

तलवाडे खूर्दे येथे पोटा संबंधित आजारावर आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार

Next Post

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

Next Post
शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add