Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

team by team
March 30, 2023
in राष्ट्रीय
0
राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई l

लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक  देत आहोत.  अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३ हजार ६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४ हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फाऊंडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांऊडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाऊंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१  यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन  गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन  तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.

पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सर्वोत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार

पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची आधार सिडींगमध्ये यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याचा ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघरमध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याचा ९६ टक्के नोंद केल्याबद्दल तृतीय क्रमांक आहे.

तर नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली, मुंबईमध्ये ९९ टक्के नोंद  असल्याने प्रथम क्रमांक, घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असल्याने द्व‍ितीय क्रमांक, तर दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असल्याने तृतीय क्रमांक आहे. या जिल्ह्यांना व नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आयसीडीएस योजनेसोबत प्रशंसनीय काम केल्याबद्दल सीएसआर कंपनी पारले ॲग्रो प्रा.लिमिटेड, यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लिमिटेड यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.  पुणे १ नागरी प्रकल्पच्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, दालमिया फांउडेशन,भागीरथी फांउडेशन, कॉरबेट फाउंडेशन, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद,आर.एस.एस.जनकल्याण समिती, होप फॉर दि चिल्ड्रेन, युनायटेड वे दिल्ली, रोटरी डिस्ट्रीक्ट,के कॉर्प फांउडेशन,यार्दी फाउंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रामजी की निकली सवारी: शहादा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्य मोटरसायकल रॅली

Next Post

सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

Next Post
सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add