चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
तळोदा तालुका भोई समाज अध्यक्ष संतोष वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात भोई समाज युवा तालुका अध्यक्षपदी राहुल शिवदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यात शहराध्यक्षपदी राकेश सोनवणे, तालुका उपाध्यक्षपदी भरत वाडीले, कोषाध्यक्षपदी अभिषेक नुक्ते, कार्याध्यक्षपदी मयुर ढोले, सचिवपदी मयुर वाडीले, सहसचिवपदी अक्षय सोनवणे, संघटक पदी कल्पेश रामोळे, प्रसिद्धी प्रमुख पदी धीरज सोनवणे तसेच निरज रामोळे, ललित ढोले, मयुर सोनवणे, मयुर वानखेडे, सचिन तावडे, शुभम साठे, दिनेश वानखेडे, अमोल वानखेडे, धीरज साठे, पवन मोरे, गणेश जावरे आदींची सदस्यपदी निवड झाली आहे.
यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, जगदीश वानखेडे, संतोष शिवदे, धनराज सोनवणे, प्रमोद मोरे, गणेश शिवदे, संतोष सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.








