Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी 2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

team by team
March 29, 2023
in शैक्षणिक
0
आदर्श आश्रमशाळेच्या प्रवेशासाठी  2 एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

एकात्मिक आदिवासी‍ विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आदर्श आश्रमशाळा देवमोगरा ता.नवापूर येथील निवासी शाळेत सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा रविवार 2 एप्रिल,2023 रोजी होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर प्रवेश पूर्व परीक्षा रविवार 2 एप्रिल,2023 रोजी सकाळी 11 ते 12-30 या वेळेत शासकीय आश्रमशाळा शिर्वे ता.तळोदा जि.नंदुरबार या परीक्षा केंद्रावर होईल. परीक्षा  भाषा व सामाजिक शास्त्रे, गणित, बुद्धीमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान या अभ्यासक्रमांवर होईल. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आधी उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शासन प्रमाणित ओळखपत्र किंवा आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असतील अशाच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल.
विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत केवळ 1 पेन, पाणी बॉटल, तसेच परीक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक साहित्य आणावे. पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. कोणताही विद्यार्थी परीक्षा देतांना गैरप्रकार करतांना आढळल्यास विद्यार्थ्यांला परीक्षेस अपात्र करण्यात येईल, असे एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Next Post

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले

Next Post
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add